fbpx
Thursday, April 25, 2019

पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होतीः निसार अहमद तांत्रे

यूएईने भारताच्या स्वाधीन केलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खुलासा

निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे.14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे. निसार अहमद तांत्रे याची सध्या राष्ट्रीय तपास पथकाकडून
(एनआयए) चौकशी करण्यात येत आहे.
संयुक्त अरब अमीरातने (यूएई) नुकताच भारताला सोपवलेल्या कुप्रसिद्ध ‘जैश-ए-मोहम्मद’चा दहशतवादी निसार अहमद तांत्रे याने पुलवामा हल्ल्याची आपल्याला माहिती असल्याचा खुलासा केला. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने ही माहिती दिली. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती असल्याचे त्यानं सांगितले आहे.
निसार अहमद तांत्रे याची सध्या राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) चौकशी करीत आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार ‘जैश‘च्या आदेशानुसारच पुलवामाचा हल्ला झाला होता. त्याचबरोबर खान याच व्यक्तीने तो घडवला असल्याच्या माहितीलाही त्याने दुजोरा दिला. खान यानेच या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. तपास पथकांना आपल्या गुप्तचरांची माहिती आणि खालच्या स्तरावरील दहशतवाद्यांच्या चौकशीवरच तपास निर्भर होता. निसार अहमद तांत्रेने दिलेली ही माहिती महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे.
काश्मीर खोऱ्यात तांत्रेचा ‘जैश’ च्या कार्यकर्त्यांवर चांगलाच प्रभाव असल्याचे गुप्तचर यंत्रणेने सांगितले आहे. खानने तांत्रेला त्याला सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती दिली होती. याबाबत खानने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या मध्यात पुलवामात तो अनेक मोठे स्फोट घडवून आणणार आहे. त्याचबरोबर खानने तांत्रेकडून या हल्ल्यासाठी नियोजन आणि तो प्रत्यक्ष घडवून आणण्यासाठी मदत मागितली असल्याचा दावाही तांत्रेने चौकशीदरम्यान केल्याचे समजते.
कोण आहे निसार अहमद तांत्रे?
‘जैश’चा निसार अहमद तांत्रे हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. 30 आणि 31 डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते. तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
निसार तांत्रे हा जैशच्या दक्षिण काश्मीरचा विभागीय कमांडर नूर तांत्रे यांचा भाऊ असून त्याला यूएईमधून विशेष विमानाने दिल्लीत आणून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआय) स्वाधीन करण्यात आले होते. एनआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. नूर तांत्रे यानेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोऱ्यात जम बसवायला मदत केली असे मानले यावरून तांत्रे हा जैशचा मोठा मासा असल्याचेही बोलले जात आहे. त्याचा भाऊ नूर तांत्रे याला डिसेंबर 2017 मध्ये एका चकमकीत ठार करण्यात आले होते.
यूएईकडून गेल्या काही काळात भारताला चांगली मदत
यूएईने आतापर्यंत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात लाच खाण्याचा आरोप असलेला आरोपी ख्रिश्चियन मिशेल, या प्रकरणातील कथित दलाल दीपक तलवार यांच्या व्यतिरिक्त दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे समर्थक, इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद सिद्दिबापा आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी फारूख टकलासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार तांत्रे याच वर्षी भारतातून यूएईला पळून गेल्याचे सांगितले जात आहे.
लेथपोरा प्रकरणातच पुलवामा येथील अवंतीपुराचा रहिवासी असलेल्या फय्याज अहमद मॅग्रे याला फेब्रुवारीत अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्रालचा फरदीन अहमद खांडे, पुलवामाच्या द्रुबग्रामचा रहिवासी मंजूर बाबा आणि पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल शकूर यांना ठार करण्यात आले होते. शकूर हा पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोटचा रहिवासी होता. फेब्रुवारीमध्ये एनआयने अटक केलेला फय्याज हा दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मदचा सक्रिय सदस्य होता. फय्याजने हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लपण्यासाठी जागा, हत्यारे आणि माहिती उपलब्ध केली होती.
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

महत्त्वाचे

फेसबुक

ट्विटर